Lek Ladaki Yojana In Marathi
Lek Ladaki Yojana In Marathi : लेक लाडकी योजना : महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून लेक लाडकी योजनाची पुकारणी 2023 -24 च्या बजेट व्याख्यानात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली होती.2017 पासून अगोदर जी योजना चालू होती जिचे नाव माजी कन्या भाग्यश्री योजना हीच बदलून आता बदलून लेक लाडकी ही योजना सुरु करण्यात आली.राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेली ही खूप उत्तम आणि उत्कृष्ट योजना आहे.लेक लाडकी योजने अंतर्गत सरकार मार्फत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक परिवारातील मुलीला टप्प्या टप्प्याने अनुदान देण्यात येऊन,तिच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. महिला व बालविकास विभाग यांचा मार्फत लेक लाडकी ही योजना चालवली जाते.लेक लाडकी योजने मार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र ठरलेल्या मुलींना 101000/- ( एक लाख एक हजार रुपये एवढे धन लाभच्या स्वरूपात मिळणार आहे.
लेक लाडकी योजना ही मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे म्हणूनच सरकार ने मुलींना पोल्ट्री फार्म योजने द्वारे 33% सबसिडी सोबत 9 लाखा पर्यंत चे लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने च्या माध्यमातून मुलींचे भविष्य खूप उज्वल होईल व त्यांना या योजनेचा खूप फायदा होईल.
लेक लाडकी या योजने द्वारे राज्यसरकारची प्रमुख धोरणे आहेत.मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन करणे.मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे.मुलींचा बाल विवाह बंद करून त्यांचा मृत्यू दर कमी करणे.कुपोषण कमी करणे या दिशेने राज्यसरकार प्रयत्न करणार आहे.
तर मित्रानो आपण या लेखमध्ये लेक लाडकी योजना काय आहे या योजनेची मुख्य धोरणे काय आहे.. जर या योजनेचा लाभ घेयचा असेल तर त्यासाठी आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे. अर्ज कुठे बर कसा करायचा या योजनेचे फायदे काय त्याची पात्रता काय व संबंधित योजने बद्दल तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे.
Lek Ladaki Yojana In Marathi : सदर योजना सुरु करण्याचे धोरणे किंवा उद्देश : आर्थिक परिस्तिथी ने गरीब असलेल्या परिवारातील सर्व लाभार्थी मुलींना त्यांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकार 5 टप्प्यात पात्र मुलींना आर्थिक मदत करणार आहे. पात्र ठरलेल्या मुलीचे वय वर्षे 18 पूर्ण होताच तिला 75000 रु एवढे अर्थ साहाय्य मिळणार आहे.लेक लाडकी योजना राबवून, होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्याच वाढत प्रमाणाचा आढावा घेऊन व मुलींचा जन्मदर वाढवून बाल विवाह रोखून मुलींना आत्मनिर्भर, स्वावलंबी व त्यांना आर्थिक दृष्टया सक्षम बनविणे हाच मुख्य उद्देश सदर योजनेचा आहे.
महाराष्ट्र राज्यात गरीब कुटूंब व आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, या करणा मुळे कुटुंबातील होतकरू व हुशार मुली असताना सुद्धा फक्त परिस्थिती मुळे त्याना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. आजच्या युगात स्त्रीयांचे शिक्षण खूप महत्वाचे आहे. त्या शिकून आपल्या परिवाराचे व आपल्या देशाचे नाव उज्वल करू शकते त्त्यांचा उज्वल भविष्या साठी सरकार त्यांना लेक लाडकी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करणार आहे.
मुलीनं विरुद्ध होणारा अन्याय जसे की बाल विवाह, स्त्री भ्रूण हत्या शाळा बाह्य मुलींच वाढते प्रमाण कुपोषण ह्या सर्व गोष्टी बंद करून मुलींच्या जन्मदर वाढवण्यास प्रोत्साहित करून प्रयत्न करणे हे सुद्धा सदर योजना चालू करण्या मागचे एक धोरन आहे.
Lek ladaki Yojana In Marathi : लेक लाडकी या योजने अंतर्गत मिळणारे फायदे व लाभ.
लेक लाडकी योजना ही सरकार ने मुलींच्या भवितव्यचा दृष्टीकोनतून काढलेली खूप उत्तम व फायदेशीर ठरणारी योजना आहे. या योजने द्वारे लाभार्थी कुटुंबातील मुलीला तिच्या जन्म झालयपासून ते तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत सरकार आर्थिक मदत करणार आहे. ही रक्कम 5 टप्प्यात दिली जाणार आहे तसेच एकूण रकमेची किंमत 101000 रुपये एव्हडी असणार आहे. या मुळे ज्या मुलीला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेलं त्या मुलीला पैशांची चिंता न करता आपले शिक्षण पूर्ण करून
स्वतःच्या पायावर उभे राहून.. आत्मनिर्भर होऊन स्वतःचे भविष्यात उज्वल करेल. राज्यातील बऱ्याच मुलींना हुशार व होतकरू असताना सुद्धा त्यांचा कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती मुळे आपले शालेय व महाविद्यालइन शिक्षण पूर्ण करता येत नाही, याचा आढावा लक्षात घेता सरकार ने लेक लाडकी योजना सुरु केली आहे. याचा फायदा मुलींना मिळणार आहे.
मुलींना अनुक्रमे पाच टप्प्यात हे पैसे मिळणार आहेत ते कसे हे आपण पाहूया.
तर पहिल्या टप्प्यामध्ये मुलीचा जेव्हा जन्म होईल तेव्हा पात्र मुलीला
5000/ रुपये रोख देण्यात येणार आहे. ही रक्कम मुलीच्या पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दुसऱ्या टप्प्या मध्ये मुलगी जेव्हा शाळेत पहिली मध्ये जाईल तेव्हा तिला तिच्या शिक्षणाची सुरवात करण्यास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून 6000/- एव्हडी रक्कम मिळणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मुलगी ही इयत्ता 6 वी मध्ये पदार्पण केल्या नंतर तिला 7000/- रुपये मिळणार आहेत.व मुलगी जेव्हा 11 वी म्हणजेच महाविदयालयात जाईल तेव्हा त्या मुलीला सरकार तर्फे 8000 रुपये देण्यात येणार आहे. आणि शेवटचा म्हणजे पाचव्या टप्प्या मध्ये जेव्हा मुलीचे वय वर्षे 18 पूर्ण होईल तेव्हा 75000/- एव्हडी रक्कम लाभार्थी मुलीला देण्यात येणार आहे. असे एकूण 101000 रुपये इतकी आर्थिक मदत सरकार लेक लाडकी योजने अंतर्गत करणार आहे.
या सर्व गोष्टीचा लाभ घेऊन मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहील व तिचे व तिच्या पालकांचे भविष्या उज्वल करेल तिच्या ज्या ही इचछा व अपेक्षा असतील त्या तिला पूर्ण करता येतील आणि समाजात तिला ताठ मानेने वावरता येईल. आज पर्यंत मुलींवर लावलेले सर्व नकरात्मक निर्बंध लेक लाडकी योजने अंतर्गत कमी करण्यास मदत होईल.
हे सुद्धा वाचा https://yojanabhumi.com/krushi-yojana/
Lek ladki Yoajana Marathi : लेक लाडकी योजना.पात्रता व नियम.
महाराष्ट्रा राज्यसरकार ने राबवलेल्या या योजनेचा जर आपणास लाभ घेयचा असेल तर सरकार ने लागू केलेल्या नियम व अटीची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे. तरच सदर योजनेचा लाभ आपणास घेता येईल.
पहिला नियम म्हणजे जर तुम्हला लेक लाडकी या योजनेचा लाभ घेयचा असेल तर तुमी महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे अत्यंत गरजेचं आहे.
पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक परिवार जर असेल तरच या योजनेसाठी ती मुलगी पात्र ठरेलं अथवा मुलीला लाभ मिळणार नाही. तसेच सदर मुलीच्या परिवारचे
एक वर्षाचे उत्पन्न हे 1 लाख पेक्षा कमी असले पाहिजे.
ज्या मुलीला या योजनेचा लाभ घेयचा आहे त्याच मुलीचे बँक खाते आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 या तारखे नंतर झालेला असला पाहिजे. लेक लाडकी या योजनेचा लाभ मुलीलातिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे. अर्ज करत्या मुलीच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती सरकारी नोकरीं मध्ये कार्यरत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लेक लाडकी या योजनेचा अर्ज प्रविष्ठ करते वेळी मुलीच्या
पालकांना कुटुंब नियोजन प्रमाण पत्र हे सादर करणे हे अतिवश्यक आहे.
दुसऱ्या प्रसूती वेळीस जर जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोनी मुलींना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. तरी ही मात्र या प्रसूती नंतर पालकांने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे अनिवार्य राहील.
समजा जर परिवारा मध्ये, दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा व एक मुलगी आहे व त्यानंतर एक मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्या असतील तर त्या दोनी मुलींना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे.मात्र या नंतर माता पित्या ने कुटुंब नियोजन शस्त्र क्रिया करणे हे आवश्यक आहे.
Lek Ladki Yojana In Marathi : अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
जर आपल्याला लेक लाडकी योजनेचा लाभ घेयचा असेल तर आपल्याला सरकार ने नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे पत्रे सादर करावे लागतील ते खालील प्रमाणे आहेत.
जन्म दाखला : लेक लाडकी योजनेचा अर्ज भरणा करण्यासाठी लाभार्थी मुलीचा म्हणजे ज्या मुलीच्या नावाने अर्ज करायचा आहे त्या मुलीचा जन्म दाखला हा आवश्यक आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र : लेक लाडकी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी लाभार्थी मुलीच्या परिवारातील कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला यावरील वार्षिक उत्पन्न हे एक लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आधारकार्ड : सदर योजनेचा अर्ज करायचा असेल तर लाभार्थी मुलीचे आधारकार्ड आवश्यक आहे पण पहिल्या टप्प्यात ही अट शिथिल ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच पहिल्या लाभा वेळी आधार कार्ड गरजेचे नाही आहे.
मुलीच्या पालकांचे आधारकार्ड : लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे आधारकार्ड हे महत्वाचे राहील.
पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड : सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड च चालणार आहे हे मुलीच्या पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचं आहे.
मतदानकार्ड :लेक लाडकी योजनेचा अंतिम टप्प्याचा लाभ प्राप्ती साठी लाभर्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे नाव मतदार यादी मध्ये असल्याचा दाखला म्हणजेच मतदानकार्ड सादर करणे गरजेचे असेल.
बँक पासबुक : संबंधित योजनेसाठी मुलीच्या पालकांचे बँक पासबुक चे पहिल्या पानाची प्रत ( झेरॉक्स ) असणे आवश्यक आहे.
बोनाफाईट दाखला : ज्या टप्प्यावर मुलीला लाभ घेयचा आहे त्या वर्गात मुलगी शिकत असेल त्याचा बोनाफाईट दाखला सदर योजनेसाठी गरजेचा आहे.
कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया प्रमाण पत्र : लेक लाडकी योजनेचा लाभासाठी परिवाराने केलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे.
लाभर्थी मुलीचा अविवाहित दाखला : शेवटच्या लाभकारिता मुलीला म्हणजेच वय वर्षे 18 पूर्ण झाल्यानंतर मुलीचा विवाह झालेला नसेल तर मुलीचा अविवाहित असलेले स्वघोषित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
फोटो : लाभार्थी मुलीचे दोन पासपोर्ट साईझ चे फोटो या योजनेसाठी आवश्यक असणार आहे.
Lek Ladaki Yojana In Marathi :
अर्ज प्रक्रिया
लेक लाडकी या योजनेचा अर्ज हा कशा प्रकारे व कोणत्या पद्धतीने व कुठे करायचा आहे हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते खालील प्रमाणे.
अगोदर आपणास लेक लाडकी योजने च्या नोंदणी साठी एक फॉर्म दिला जाईल त्या मध्ये लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती म्हणजे जी मुलगी आहे तिचे नाव आधारकार्ड चा जो नंबर असेल मुलीच्या पालकांचे नाव त्यानंतर तुमचा जो राहत्या घराचा पत्ता असेल तो टाकायचा आहे, बँकेचे नाव ifsc code, पालकांची ची सही आणि सर्व अवशयक कागदपत्रे या फॉर्म ला जोडायचा आहे. हा फॉर्म तुमी तुमच्या भागातील जे कोणी अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे जमा करायचा आहे बाकीचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविका भरून देतील.
तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने जेव्हा वेवस्तीत भरला जाईल त्या बद्द्ल ची माहिती तुमहाला तुमच्या मोबाईल क्रमांक वर sms द्वारे कळविले जाईल.
तर वर दिलेल्या पद्धतीने लाभार्थी मुलीच्या पालकांने,लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे व आपल्या मुलीला या योजनेचा लाभ प्राप्त करून देयचा आहे.
Lek Ladki Yojana In Marathi :
वाचकहो आपण या लेखा मध्ये लेक लाडकी या योजने संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतलेले आहे. तरीही आपल्याला सदर योजने बाबत काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे.
प्रश्न :लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर – लेक लाडकी योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरून तो फॉर्म आपल्या भागातील जवळच्या अंगणवाडी सेविका जवळ प्रविष्ट करायचा आहे.
प्रश्न लेक लाडकी योजने साठी कोणती पात्रता आहे?
उत्तर – महाराष्ट्रा राज्यातील असे कटुंब जे आर्थिक परिस्थिती ने गरीब असतील जे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड धारक असतिल अशा कुटुंबातील सर्व मुलीं या योजनेसाठी पात्र असतील.
प्रश्न :लेक लाडकी योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील?
उत्तर – लेक लाडकी योजने साठी तुमच्या कडे आधारकार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाण पत्र, शाळेचा दखल, जन्म दाखला, मतदान कार्ड, फोटो असे सर्व आवश्यक कागदपत्रे लागतील.
प्रश्न :लेक लाडकी योजने साठी वयाची काय अट आहे.?
उत्तर – सदर योजनेसाठी मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होणे वयाची अट आहे.
प्रश्न : जुळ्या मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळेल का?
उत्तर : हो जुळ्या मुली असतील तर दोनी मुलींना सदर योजनेचा लाभ मिळेल पण त्यानंतर कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील.